बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘टक्कल का पडते रे भावा?’ हा प्रश्न राज्यभरातील अनेकांना पडला आहे.बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातर्गत 11 गावांमध्ये केस गळतीचे रुग्ण आढळले.दरम्यान शास्त्रज्ञ या केस बाधितांच्या केसांच्या मुळापर्यंत गेले असून,उद्या याच्या नेमक्या कारणाचा खुलासा होणार आहे.
अचानक केस गळतीच्या अजब आजाराचे मुळ शोधण्यासाठी दिल्ली, चेन्नई येथील ICMR शास्त्रज्ञ, होमिओपॅथी आयुष युनानीचे तज्ञ डॉक्टारांना संशोधन कार्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यासंदर्भातील अधिकृत रिपोर्टची माहिती आज 3 फ्रेबुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत,अशी माहिती प्राप्त झाली आहे.














