चिखली (हॅलो बुलडाणा) मा.न्यायालय दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या आदेशानुसार, वादींच्या प्लॉटची ताबे पावती व ताबे पंचनामा कोर्टाचे बेलीफ करीत असताना त्यांनी तयार केलेली कागदपत्रे हातातून हिसकावून फाडून टाकल्याची घटना चिखली येथील सैलानी नगरात घडली.दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी फौजन हुसेन ह्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
मा.दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर चिखली कोर्टाचे बेलीफ सैलानी नगर चिखली येथील वादी निवृत्ती देवराव कऱ्हाडे, दुर्गाबाई गणपत महाले,पुरुषोत्तम गणपत महाले,भागवत गणपत महाले, शांता गजानन हारणे,नंदा संतोष गायकवाड,जमीर खान आमिर खान यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, ताबेपावती व ताबे पंचनामा करून देत होते.यावेळी प्लॉटवर ताबा सांगणारा बहुजन हुसेन जाकीर हुसेन याने बेलीफ यांच्या हाताला झटका देत प्लॉटची ताबे पावती व ताबे पंचनाम्याची शासकीय कागदपत्रे हिसकावून फाडून टाकली.शिवाय बेलीफ सह वादी यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.