spot_img
spot_img

केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणतात… ह्या औषधी स्वस्त! – शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, विद्यार्थी सर्व घटकांना विकासाची संधी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कॅन्सरसह 36 जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क केंद्र सरकारने संपूर्णपणे माफ केल्याने ही औषधे स्वस्त होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे हा अर्थ संकल्प शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, विद्यार्थी सर्व घटकांना विकासाची संधी उपलब्ध करूण , सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देणारा आणि देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा असल्याचे ही म्हटले आहे

दिल्ली येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला . यामध्ये कॅन्सर सह इतर 36 औषधांवरील सीमा शुल्क पूर्णतः माफ केल्याने ही औषधे स्वस्त होणार असून त्याचा फायदा सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना होणार आहे . शिवाय अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरिकरण, खाणकाम, अर्थ, कर आदी क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकरी, महिला, युवक, गरीब वर्गासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. महिलांच्या कौशल्याविकास प्राथम्याचा विषय आहे. पंतप्रधान धनधान्य योजनेंतर्गत शेती उत्पादकता वाढ, शेतमाल साठवणूक सुविधा, सिंचन आणि क्रेडीट सुविधांवर भर देण्यात येणार असून शंभर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे .
बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पातील नव्या कररचनेमुळे 12 लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना 80 हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमाफी मिळणार आहे. 18 लाख उत्पन्नधारकांना 70 हजारांचा फायदा होणार आहे. 25 लाख उत्पन्न असलेल्यांचा कर 1 लाख 25 हजारांनी कमी होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजारांहून 1 लाख करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. . मोबाईल फोन देखील स्वस्त होणार असल्याने देशातील प्रत्येक घराला, व्यक्तीला या निर्णयाचा लाभ होईल. केंद्रीय अर्थसंकल्पातून औषधावरील सीमा शुल्क पूर्णतः रद्द केल्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांचे आभार,” केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी माणून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!