बुलढाणा (हॅलो बुलडाणा) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपले सडेतोड मत व्यक्त केले. या अर्थसंकल्पात देशातील सर्वांगीण घटकाचा विचार करण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला असला तरी, अर्थसंकल्पात शेतकरी व शेतमजूरांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे.
या अर्थसंकल्पावर शेतकरी नेते रविकांत तुपकर तिखटच बोलले..ते म्हणाले की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेली नाही..शेतमालाला हमीभावाचा कायदा झाला नाही..गावोगावी शेती सिंचनाची सुविधा झालेली नाही.. शेतमाल गोदामं मिळाली नाही..एकूणच या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना ठोस असे काही मिळाले नाही त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी दिशाहीन आणि निराशाजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
परंतु या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी पक्षाने जोरदार स्वागत केले.नोकरदार वर्ग मात्र कमालीचा खुश झाला असून त्यांच्यासाठी हा अर्थसंकल्प खुशीचा ठरला आहे.