spot_img
spot_img

💥इम्पॅक्ट! ‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीमुळे.. कुंभमेळ्यात बेपत्ता वृद्ध महिला वाराणसीत सापडली! – पालकमंत्र्याची तत्परता!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात हरवलेली वृद्ध महिला अखेर वाराणसी येथे सापडली आहे.या संदर्भात हॅलो बुलढाणा ने सर्वप्रथम बातमी प्रसारित केली होती.पालकमंत्री ना. मकरंद पाटील आणि जिल्हा प्रशासनाच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने उषाबाई लक्ष्मण बोरले हिला सुखरूप शोधण्यात यश आले. पालकमंत्री मकरंद पाटील यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, महिलेचा मुलासोबत फोनवर संवाद साधून दिला गेला आहे.

उषाबाई लक्ष्मण बोरले रा. मलकापूर या आपल्या सहकाऱ्यांसोबत कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेल्या होत्या. मात्र, गर्दीमध्ये त्या हरवून गेल्या आणि त्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या महिलेशीही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता पसरली होती.
महिलेच्या बेपत्त्याची माहिती मिळताच पालकमंत्री ना मकरंद पाटील, बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने उत्तर प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधला. अखेर, समन्वयातून महिलेचा ठावठिकाणा वाराणसी येथे लागला.

▪️पालकमंत्री, प्रशासनाच्या तत्परतेने दिलासा!
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी उत्तर प्रदेश सरकारशी समन्वय साधून महिलेचा शोध घेतला. पोलिसांनी तिला सुरक्षित स्थळी हलवून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यास मदत केली.

▪️जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन!

या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या कुंभमेळ्यातील आपत्कालीन स्थितीत प्रयागराज कंट्रोल रुम टोल फ्री क्रमांक 1920, दुरध्वनी क्रमांक 0522-2237515 उपलब्ध केला आहे. तसेच मंत्रालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले असून त्या संपर्क क्रमांक 02222027990 असा आहे. त्यासोबतच अमरावतीचे विभागीय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या 07212661364 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. यासह जिल्हा पोलीस नियत्रंण कक्षाने. 07262242400 तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक 07262242683 हा उपलब्ध केला आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!