लोणार (हॅलो बुलडाणा/संदीप मापारी पाटील) लोणार शहरातील विनायक चौकाच्या जवळील वुन्नत ज्वेलर्स येथून सराफा व्यापारी श्रेयांस केसरीमल संचेती यांचे दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून १५ लाख ४९ हजारांची चोरी केली. या मध्ये चांदीच्या तोरड्या २० किलो साध्या तोरड्या ६ किलो असे एकूण २६ किलो चांदीचे १५ लाख ३० हजाराचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. श्रेयांस संचेती हे नेहमी प्रमाणे २९ जानेवारी सयंकाळी दुकान बंद करून घरी गेले व समोरील दुकानदार यांनी त्यांचे शेटर तोडल्याचे दिसून आले त्या नंतर त्यांनी ताबडतोब श्रेयांस संचेती यांना माहिती दिली .
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांनी ताबडतोड घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली या नंतर अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुने पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.या नंतर लोणार पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले लेखनिक गणेश लोढे जमादार नितीन खराडे जमादार संतोष चव्हाण संजय जाधव यांनी पंचनामा केला
श्रेयांस संचेती यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलीसानी अज्ञात चोरां विरुद्ध अपराध क्रमांक २९/२०२५ कलम ३३४ ३०५ अ भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले नितीन खरडे करीत आहेत चोरट्यांचा शोध लागावा म्हणून घटनास्थळी ठसे तज्ञ ची चमू तसेच स्थानिक गुन्हे शाखेची चमूला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.