मेहकर (अनिल राठोड /हॅलो बुलडाणा) हंगामाच्या तोंडावर अज्ञात चोरट्यांनी मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी टाकलेले मोटार पंप चोरून नेले तसेच काही मोटर पंपा मधील तांब्याची तार बाहेर काढून नेऊन मोटारींची नसधूस केली. यामध्ये जवळपास 17 ते 18 शेतकऱ्यांच्या मोटार पंपांना अज्ञात चोरट्यांनी 29 डिसेंबरच्या मध्यरात्री चुना लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलेआहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेहकर तालुक्यातील बोराडी जलाशयामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोटार पंप टाकलेले आहेत. यातील धरणाच्या सांडव्याच्या काठावरील मोटार पंप अज्ञात चोरट्याने 29 जानेवारीच्या मध्यरात्री चोरून नेले आहे. काही मोटारींची तोडफोड करून त्यामधील तांब्याची तार काढून नेली. यामध्ये रामेश्वर देवकर, मनोहर देवकर, गजानन जेठे, रमेश देवकर, मोहन देवकर, बद्रीनाथ देवकर, मनीष धोंडगे, दत्तात्रय देवकर, लक्ष्मण मगर, अश्रू देवकर, प्रवीण धांडे, रामकिसन राऊत, सुरेश देवकर, दिगंबर बळी, लक्ष्मण देवकर, हरिश्चंद्र बाबडे, रामदास देवकर आदी शेतकऱ्यांच्या मोटारींची नासधूस मोटार मधील तांब्याची तार काढून नेल्यामुळे खूप मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या अज्ञात चोरट्यांचा शोध घ्यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. या चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन मेहकर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.