spot_img
spot_img

💥दुखदवार्ता! जेष्ठ पर्यावरण प्रेमी,समजसेवक पुंडलिकदादा मापारी यांचे देहावसन !

लोणार (हॅलो बुलडाणा) येथील दुर्गा टेकडी येथील वनराई निर्माते, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण अभ्यासक, लोणार सह संपूर्ण जिल्ह्यात परिचित विचावंत पुंडलिकदादा मापारी यांनी वयाच्या 88व्या वर्षी दुर्गा टेकडी लोणार येथे दि 29 जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. एक परखड व्यक्तीमत्व, आधुनिक विचारांचे पाईक, अमोघ वक्तृत्वाचे धनी असलेले पुंडलिक मापारी गेल्या 35 वर्षांपूर्वी शहरा बाहेर असणाऱ्या ओसाड माळरान असणाऱ्या दुर्गा टेकडीवर वास्तव्यास गेले त्यांनी तेथील 250 एकरावर विविध झाडाची लागवड करून या सर्व 250 एकरावरील वनसंपदेला आपल्या आपत्या प्रमाणे जोपासुन अतिशय घनदाट अशी वनसंपदा तेथे निर्माण केली, पर्यावरणाचे सखोल ज्ञान, अध्यात्मिक ज्ञाना सोबतच विज्ञानवादी दृष्टीकोकोणाची आयुष्यभर जोपासना पुंडलिक मापारी यांनी केली, त्यांच्या निधनामुळे लोणार शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे, एक जेष्ठ वीचारवंत आणि पर्यावरणतज्ज्ञ हरपल्याची भावना जनमासनात व्यक्त केली जात आहे, त्यांच्या पश्चात एक मुलगा, 2 मुली, नातू, पुतणे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!