spot_img
spot_img

💥मार्गदर्शन! आयर्नमॅन ॲड.शरद राखोंडे म्हणाले..अभ्यास सोबत ‘खेल जरुरी है!’

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) क्रीडा दिवस हा फक्त शाळेत एक दिवस साजरा करून चालणार नाही. पालकांनी आपल्या पाल्याला दररोज मैदानावर खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे. त्यांच्यासोबत मैदानावर खेळण्यासाठी जावे. अभ्यासा सोबतच दररोजचे खेळाचे नियोजन पण आवश्यक आहे. मुलांच्या आरोग्यावरती काम करणे आवश्यक आहे. आताची मुले मैदानावर कमी खेळतात. मोबाईल , टीव्ही जास्त बघतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे आवश्यक आहे. मुलगा ओव्हरवेट असला म्हणजे तो कौतुकाचा विषय नाही तर तो चिंतेचा विषय आहे. मुलांची काळजी घेणे ही फक्त शिक्षकांची जबाबदारी नसते तर ती पालकांची देखील जबाबदारी आहे .पालकांना जर चांगल्या सवयी असतील तर मुलांना चांगल्या सवयी लागू शकतील. इतर क्षेत्रात जसे करिअर करता येतील तसेच खेळाच्या माध्यमातून पण अनेक करिअरच्या संधी सध्याच्या काळात उपलब्ध असल्याचे मत तोमाई इंग्लिश स्कूलच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना आयर्न मॅन ॲड.शरद राखोंडे यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जी.वाय व्यवहारे हे होते. डॉ.प्रतिमा व्यवहारे डॉ. माधवी जवरे, ललित चोपडा, रणजीतसिंग राजपूत,डॉ.निखील नलावडे, मुख्याध्यापक अजित जंजाळ यांची याप्रसंगी उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली

खेळाच्या माध्यमातून चांगले करिअर करण्याच्या संधी सध्याच्या काळात उपलब्ध आहेत. पालकांनी आपल्या मुलांच्या आवडीनिवडीकडे लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तोमाई स्कूल ही एक उपक्रमशील, वेगळ्या कल्पनेने आणि वेगळ्या विचारांनी प्रेरित होऊन सातत्याने काम करत आहे. मुलांनी समाजात जगत असतांना त्यांनी कसे वागावे याकडे जास्त लक्ष देऊन त्यांच्यावर संस्कार करणारी एक शिक्षण संस्था म्हणून या शाळेकडे पाहिल्या जाते असे मत डॉ. माधवी जवरे यांनी याप्रसंगी बोलतांना व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. प्रतिमा व्यवहारे यांनी खेळ म्हणजे आयुष्याला दिशा देणारा एक महत्त्वाचं साधन आहे. संयम सहनशीलता, सहकार्य ह्या सगळ्या गोष्टी खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिकायला मिळतात. शाळेत अभ्यासाबरोबरच इतर उपक्रम सातत्याने राबवले जातात असे प्रास्ताविकात सांगीतले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी योग गीतावर तालबध्द नृत्य सादर केले.शाळेत वर्षभर राबविण्यात येणार्‍या विविध स्पर्धांमधिल यशस्वी विद्यार्थांना मेडल व प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुनम कोळी,अश्विनी,अंभोरे,प्रियंका मोरे,पुजा पवार,मिनाक्षी चव्हाण, चैताली बोंद्रे,गिरीष भोसले यांचेसह शिक्षकवृदांनी व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी पुढाकार घेतला होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!