बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा तालुक्यातील दत्तपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत दत्तपूर व अफजलपूरवाडी येथे ५० लक्ष रुपयांच्या निधीतील कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आ. संजय गायकवाड व रविकांत तुपकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दत्तपूर व अफजलपूरवाडी गावच्या विकासासाठी कटिबद्ध रहाणार असल्याचा शब्द आ. संजय गायकवाड यांनी दिला. तर दत्तपूर ग्रामपंचायतला विकासाचे मॉडेल करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द रविकांत तुपकर यांनी प्रसंगी बोलतांना दिला.
यावेळी दत्तपूर येथे आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातुन मंजूर झालेल्या २० लक्ष रु. निधीच्या ग्रामपंचायत भवनच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. तर रविकांत तुपकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १० लक्ष रु. निधीतील गजानन महाराज मंदिराला करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच अफजलपूरवाडी येथे रविकांत तुपकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १० लक्ष रु. निधीतील काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. तर १० लक्ष रु. निधीतील स्मशानभूमीचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी दत्तपूर व अफजलपूरवाडी गावाकऱ्यांच्या वतीने आ.संजय गायकवाड व रविकांत तुपकरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गजानन नाईकवाडे, अजय गायकवाड, आकाश माळोदे, निषाद येरमुले, रोहित गवळी, शिवा शिंदे, सरपंच संदिप कांबळे, उपसरपंच जिवन दाभाडे, सदस्य सौ.राहिबाई रमेश जाधव,सौ.अनिता गजानन भराड, सौ.संजिवनी कैलास फुलझाडे, सौ.शितल समाधान माळोदे, गजानन जाधव, परशराम माळोदे, भागवत वानेरे, अजय जाधव, भगवान काकडे, रामधन तायडे, रामदास माळोदे, भास्कर माळोदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.