spot_img
spot_img

💥BREAKING! बुलढाणा अर्बनचा विकासगाथा नव्या उंचीवर – नवे अध्यक्ष डॉ.झंवर! राधेश्याम चांडक यांचा वारसा – डॉ. झंवर यांच्याकडे धुरा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आशिया खंडातील नावाजलेली आणि विश्वासार्ह अशी बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी आता नव्या नेतृत्वाखाली वाटचाल करत आहे. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सुकेश झंवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, या निर्णयामुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.माजी अध्यक्ष सर्वेसर्वा राधेश्याम चांडक (भाईजी) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. सुकेश झंवर हे बुलढाणा अर्बनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आर्थिक मजबुतीसह तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यात मोठे यश संपादन केले आहे.

डॉ. झंवर यांनी राधेश्याम चांडक यांच्या खांद्याला खांदा लावून संस्थेला आशिया खंडात आदर्श मॉडेल बनवले. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. बुलढाणा अर्बनच्या कामगिरीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली असून, संस्थेला यशस्वीपणे जागतिक पातळीवर नेले आहे.

डॉ. सुकेश झंवर हे लोकांच्या मनातील नेते आहेत. संकटसमयी मदतीचा हात देण्याचा त्यांचा स्वभाव, गरजूंना वेळोवेळी आधार देण्याची वृत्ती, आणि नेतृत्वगुणांमुळे ते देश-विदेशात ओळखले जातात. त्यांच्या निवडीने संस्थेच्या सभासदांमध्ये आणि हितचिंतकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.डॉ. झंवर यांची नियुक्ती ही बुलढाणा अर्बनच्या यशाचा नवा अध्याय ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था नवीन शिखर गाठेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!