चौथा (हॅलो बुलडाणा / भागवत गायकवाड) आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी चौथा येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण सरपंच सौ. शारदा गजानन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले, तर शहीद पंढरीनाथ नप्ते स्मृतिपिकचर्सचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या सौ. नव्हते ताई यांच्या शुभहस्ते पार पडले.
जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. भागवत गायकवाड यांनी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधानाचे पूजन सरपंच सौ. शारदा गायकवाड व ग्रामपंचायत सदस्यांनी केले. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सोहम तांगडे यांनी प्रभावीपणे केले, तर प्रतिज्ञा नील तांगडे यांनी सादर केली.
कार्यक्रमाचे संचलन श्री. आर. पी. जाधव सर यांनी कौशल्याने पार पाडले. यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नाट्यप्रवेश व नृत्य सादर करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला, ज्यात चौथा गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चौथा गावाने एकात्मतेचा व देशभक्तीचा संदेश दिला.