बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शीर्षक वाचून तुम्ही आवाक झाले असाल.. पण ती माल वाहते..धूर सोडते.. कुणालाही भिडते.. कधी जीवित हानी व कोणाला अपंगत्वही आणते. परंतु नियमांचे पालन करीत नाही. ती म्हणजे नेमकी कोण तर ट्रान्सपोर्टची भरधाव रस्त्यावर धावणारी गाडी! 2524 वाहनांवर फिटनेस सर्टिफिकेट नसल्याने आरटीओ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
बुलढाणा शहरात व जिल्ह्यातून अनेक ट्रान्सपोर्ट ची वाहने धावतात. यामध्ये अनेक वाहनांचे अपघात होतात. कारण वाहनातील तांत्रिक बिघाड किंवा चालकांची चूक याला कारणीभूत ठरते. आपले वाहन सुरक्षित आहे किंवा नाही हे तपासणे चालक व मालकांचे कर्तव्य आहे. शिवाय आरटीओ विभागाचे देखील वाहने तपासणे कर्तव्यचे आहे. परंतु वाहनांची तपासणी मोजकीच होते. एक एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत आरटीओ विभागाने 2524 वाहनांवर फिटनेस सर्टिफिकेट नसल्याने कारवाई केली. त्यांच्याकडून 23 लाख 71 हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. ट्रान्सपोर्टच्या 2700 वाहनांची तपासणी करून त्यांना वाहन सुरक्षिततेचा धडा देण्यात आला. तपासणी करताना 1163 गाड्यांची पियूसी नसल्याचे समोर आले. तर 1080 गड्यांना फिटनेस मेमो देण्यात आला आहे. 58 गाड्यांची फिटनेस सर्टिफिकेट रद्द करण्यात आले. हेल्मेट सक्तीच्या दरम्यान 1415 केसेस करून दंड करण्यात आला. दरम्यान अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असून वाहन चालकांनी दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.