spot_img
spot_img

💥सूचना! मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला पुन्हा सूत्रसंचालका कडून त्या चुकांची पुनरावृत्ती व्हायलाच नको!! – एका नागरिकाचे ‘हॅलो बुलडाणा’ मार्फत यंत्रणेला संकेत!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला पुन्हा सूत्रसंचालका कडून त्या चुकांची पुनरावृत्ती व्हायलाच नको! अशी तक्रार ‘हॅलो बुलढाणा’ ला करण्यात आली आहे.हे सत्य असेल तर,यंत्रणेने चुका दुरुस्त कराव्यात..अशी मागणी आहे.

हा नागरिक काय म्हणतो त्यांच्या शब्दात वाचा…
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय मुख्य ध्वजारोहण सोहळा हा मग दिल्लीतील असो की जिल्ह्यातील असो तेथील शासकीय अस्मितेची गरिमा राखणाराच असतो अशा वेळेस तेथील सर्व कार्यक्रमाचा गाभा हा सूत्र संचालक असतो परंतु मागील 26 जानेवारी म्हणजेच 75 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये ध्वज मंचावर वेगवेगळे अनुभव निदर्शनास आलेले दिसले होते बुलढाण्याचा मुख्य शासकीय पंच्याहत्तर व प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा हा पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हा पोलीस कवायत मैदानावर पार पडला होता सोहळ्या वेळी नेमून दिलेली कामे ही वेळेवर पार पाडावी लागत असतात आणि ती बरोबर व्हावी याचे काटेकोर पालन केले जावे यासाठी शासनाने नियमावली घालून दिलेली आहे त्या ध्वज संहिता नुसार सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावी याची दक्षता घेणे गरजेचे असते.परंतु मुख्य सूत्रसंचालक व सह सूत्रसंचालक यापैकी एकाने राष्ट्रध्वज फडकल्या फडकल्या राष्ट्रगीताची कमांड देणे आवश्यक असते राष्ट्रगीताची गीताची कमांड देणे आवश्यक असते परंतु मागील प्रजासत्ताक दिन तब्बल 15 सेकंदाचा कालावधी जाऊन सुद्धा राष्ट्रगीताची कमांड ही दिल्या गेली नव्हती परंतु बँकेचे इन्चार्ज यांनी प्रसंग धावून प्रसंगावधान राखून आपल्या पोलीस बँड पथकाचा सह राष्ट्रगीत चालू करून सन्मान कायम राखला परंतु या समारंभास अनेक चुका मागील वेळी दिसून आल्या त्या पुढील प्रमाणे
01 पालकमंत्री ध्वज मंचावर जेव्हा येतात तेव्हा किती अधिकारी आलेत त्यांच्या सोबत असलेल्या संपूर्ण अधिकारी यांचा पदनामा सह उल्लेख करणे अपेक्षित होते परंतु तसं झालेलं नव्हतं
02 :- नऊ वाजून 14 मिनिटांनी ध्वज मंचावरील एका शासकीय अधिकाऱ्याने सूत्रसंचालकाला इशारा करून सांगावे लागले की बोलणे चालू करा ही बाब चिंतनीय

03 :- नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ध्वज फडकवल्यानंतर लगेचच राष्ट्रगीताची कमांड देणे आवश्यक होते परंतु तब्बल 15 सेकंदाचा कालावधी गेल्यानंतर डायरेक्ट पोलीस बँड इन्चार्ज वर यांच्या इशारानुसार राष्ट्रगीत बँड पटकन सुरू झाले
04 :- दहा वाजून दोन मिनिटांनी सन्मान सोहळा चालू असताना सन्मान झालेला व्यक्तीचा एकीकडे सन्मान होत असलेल्या व्यक्ती दुसराच असायचा व नामोल्लेख दुसऱ्या व्यक्तीचा व्हायचा तेथे गोंधळ झाला होता
05 सलमान सोहळ्यात या होत असलेल्या चुका पाहून चक्क एका वर्दी वरील पोलीस( तत्कालीन पोलीस अधीक्षक यांचे पीआरओ) अधिकाऱ्याने शासकीय माईक हातात घेऊन स्वतःच यादी वाचून आपल्या कर्मचाऱ्यांना पारितोषिक दिले होते तेही कणखर
आवाजामध्ये
सदर घटना च्या बाबतीत आम्ही तेथे उपस्थित असलेले तहसीलदार साहेब यांना विचारणा केली असता त्यांनी चुका काही चुका झाल्याचे मान्य केले होते पुढे सुधारणा करण्यात येईल असे त्याच वेळेस सांगितले होते अपेक्षा एवढीच की त्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!