देऊळघाट (हॅलो बुलडाणा) ग्रामपंचायतच्या दुर्लक्षाने अजिंठा रोडवरील जि प मराठी व उर्दू शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने १२०० पेक्षा अधिक चिमुकल्यासह सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले होते. ही धोक्याची घंटा कुणालाच ऐकू येत नाहीये म्हणून ‘हॅलो बुलढाणा’ने आवाज बुलंद केला.सडेतोड वृत्त प्रसारित करताच यंत्रणा खडबडून जागी झाली आणि आज झपाट्याने सदर जागेतील कचरा जेसीबीच्या साह्याने हटविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.
‘हॅलो बुलढाणा’ने
अजिंठा रोडवरील जि प मराठी व उर्दू शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने १२०० पेक्षा अधिक चिमुकल्यासह सार्वजनिक आरोग्य धोक्यात आल्याचे नुकतेच वृत्त प्रसारीत केले होते. शिवाय कचरा उचलणाऱ्या घंटागाडी नावालाच असून वित्त आयोग निधी केवळ कागदपत्री खर्च होत असल्याचे घाणेरडे चित्र असल्याचे स्पष्ट केले होते. जिल्ह्यातील देऊळघाट या गाव परिसरात मुस्लीम धर्मीयांचे प्रार्थना स्थळ मस्जीद
सुध्दा असून, तिन्ही शाळेच्या मधोमध असलेल्या खुल्या जागेवर देऊळघाट गावातील काना-कोपऱ्यातील घनकचरा ग्रा.पं.देऊळघाट च्या घंटागाडीमध्ये सुका व ओला कचरा जमा करुन त्या ठिकाणी सर्रासपणे टाकल्या जात असल्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली होती
परिणामी आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक वातावरण निर्माण झाले होते.वारंवार तक्रारी देऊनही, समस्या मार्गी लागत नव्हती. दरम्यान जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.परंतु कारवाई शून्य असल्याने अखेर ‘हॅलो बुलढाणा’ च्या वृत्ताने ही समस्या मार्गी लागली आहे.














