चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार चिखली येथे प्रजासत्ताक दिन आणि संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतमातेचे आणि संविधानाचे पूजन करण्यात आले. यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून देशप्रेमाचा नारा देण्यात आला.”प्रजासत्ताक दिन चिरायू होवो, भारतीय संविधान चिरायू होवो, भारत माता की जय” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अभिनंदनीय असल्याचे दर्शवले.
या प्रसंगी किसन धोंडगे, नंदू कराळे, श्रीराम झोरे, गजानन पवार, विष्णू मुरकुटे यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. त्यांनी संविधानाच्या सन्मानासाठी आपल्या बांधिलकीचा पुन्हा प्रत्यय दिला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या कार्यक्रमाने चिखलीत देशभक्तीचा जल्लोष पसरवला. संविधानाची जपणूक आणि प्रजासत्ताक दिनाचा अभिमान अशा कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेतून जाणवला. शिवसेनेचे या क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व पुन्हा अधोरेखित झाले.