बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील लोणार,सिंदखेडराजा व नांदुरा पोलीस ठाणे अंतर्गत 3 गुन्ह्यात 17 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात व 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणा
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय!’ या ब्रीद वाक्याला डोळ्यासमोर ठेवून,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि नांदुरा पोलीस ठाण्यात दरोडा,चोरी व जबरी लूट प्रकरणी वेगळे वेगळे गुन्हे दाखल होते.तिन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी एलसीबीला सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांनी पथके स्थापन करून यश मिळविले आहे. तिन्ही प्रकरणात 17 आरोपी अटक आणि 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे.