spot_img
spot_img

💥दुर्दैवी! ती कायदेशीर थांबली होती परंतु डंपर ‘यमदूत’ बनून आला! – धोत्रा नाईकच्या ‘मुक्ताईचा’ पुण्यात अपघाती मृत्यू!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शांत व सालस स्वभावाची ‘मुक्ताई’ पुणे येथील एका ट्राफिक सिग्नल वर दुचाकी घेऊन थांबलेली होती. परंतु यमदूत बनवून आलेल्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुक्ता संतोषराव काळे असे या मृतक मुलीचे नाव आहे.ती चिखली तालुक्यातील धोत्रानाईक येथील संतोषराव शिवाजी काळे यांची कन्या व अरविंद माधवराव धवणे यांची नात आहे.मुक्ताई ही आई-वडिलांसह शिक्षणासाठी पुणे येथे वास्तव्यास होती.दरम्यान क्लासला जाताना बाणेर येथे ती ग्रीन सिग्नल मिळाल्याने थांबली होती.दरम्यान अचानक मागून आलेल्या एका
भरधाव वाहनाच्या धडकेत मुक्ताचा नियतीने डाव साधला.मुक्ताच्या दुचाकी वर आणखी एक मैत्रीण होती ती देखील जखमी झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!