चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) मतदारसंघात आज मोठा राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी सेल प्रदेश सचिव संजय गाडेकर, त्यांच्या पत्नी आणि तेल्हारा ग्रामपंचायतीच्या सरपंच किरणताई गाडेकर, काँग्रेसचे चिखली शहर कार्याध्यक्ष निलेश अंजनकर, आणि युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर सोळंकी यांनी आपापल्या पक्षांना रामराम ठोकला आहे.
या प्रमुख नेत्यांसह काही सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षांतराचे हे वृत्त चिखलीसह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा निर्माण करत आहे.
विशेष म्हणजे, तालुक्यातील मजबूत नेते भाजपच्या गोटात सामील झाल्याने आगामी निवडणुकीत विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या राजकीय हालचालीने चिखलीतील सत्ता समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.