बुलढाणा (हॅलो बुलडाणा) वरिष्ठांच्या दुर्लक्षितपणामुळे बुलढाणा हा भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोन्याचे अंडे देणारा ठरतोय. महत्वाच्या महसूल विभागात बदनाम व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईपासून अलिप्त असलेला बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे संघटनेचे मोठे पद घेऊन मोठ्या रुबाबात शासकीय सेवा बजावत असतांना मलिदा लाटण्याचा आपला उपक्रम बिनधास्तपणे,कोणताही बोभाटा न करता निरंतरपणे राबवित आहे. जमिनीचे अनोंदणीकृत प्रमाणपत्र वाटणाऱ्या मेहकरच्या तत्कालीन मंडळ अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयाने निलंबित केले होते.मात्र ह्या बहुचर्चित विजय टेकाळे नावाच्या भ्रष्ट मंडळ अधिकाऱ्याने असे कैक गैर कारभार केले असूनही आणि त्याच्या विरुद्ध दोन वर्षापासून तक्रारी असून सुद्धा तो उजळ माथ्याने फिरतोय कसा? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
भ्रष्टाचाराच्या बाबतीत अव्वल असलेला महसूल विभाग जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने म्हणा वा सहकार्याने कुण्या सोम्या गोम्याची, राजकीय नेते मंडळी, आमदार,खासदार व एसीबीच्या कारवाईची भीती न बाळगता “डंके की चोटपर” या भ्रष्टाचारी विजय दत्तात्रय टेकाळे या बहुचर्चित मंडळ अधिकाऱ्याचे पैसे कमावण्याचे उद्योग सुरू आहेत. कुणी याच्या या उद्योगात मध्येच “उभा राहिल्यास त्याला आडवा” करण्याचे कसब त्याला चांगलेच अवगत झाले आहे.अर्थात त्याच्या या उपक्रमाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण” समर्थन व संमती आहेच,हे वेगळे सांगण्याची गरज नाही.विषय असा आहे की,बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक नियम) भंग केला असून,त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र उपविभागीय अधिकारी यांनी बुलढाणा तहसीलदार व नायब तहसीलदार (महसूल) त्यांची संयुक्त समिती गठीत करण्यात आली असल्याचे कळविले होते.परंतु याला दीड वर्षाचा कालावधी लोटला अध्यापही चौकशी झालेली नाही. चौकशी होत नसल्याने आता तक्रारदार यांची थेट जिल्हाधिकारी यांचे विरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे.भ्रष्ट मंडळाधिकारी विजय टेकाळे यांनी केलेली बोगस फेरफार नोंदणी संदर्भात तक्रारदाराने मागितलेली माहिती अप्राप्त असल्यामुळे उपजिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.दरम्यान मेहकर येथील तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी अनोंदणीकृत प्रमाणपत्र वाटले असता त्यांना चौकशी करून त्वरित निलंबित करण्यात आले होते.परंतु टेकाळेंना का मोकाट सोडण्यात देण्यात येत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बहुचर्चित मंडळ अधिकारी यांच्या सुरू असलेल्या कार्यात नियमबाह्य न होणारी डोंगरखंडाळा,येळगावसह इतर ठिकाणी केलेल्या करोडो रुपयांच्या जमिनीं, प्लॉटची ब्रोकर व धनदांडग्याच्या मर्जीने स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामपंचायत व चावडीवल्याना हाताशी धरून कोंप्रमाईस(Compromise) करून केलेल्या सर्व कामाचा उलगडा पुढील प्रत्येक सत्रात
हम अंदर की खबर रखते है.!
क्रमशः










