spot_img
spot_img

💥BREAKING! मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर यांचा राजीनामा; शिवसेनेत खळबळ! – तालुका प्रमुखपदाचा वारसा कोणाकडे? नेतृत्व निवडीवर लक्ष

मोताळा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनेला मोठा धक्का बसला आहे. मोताळा तालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य रामदास भगवान चौथनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्याकडे राजीनामा सादर करत वैयक्तिक व घरगुती कारणांमुळे संघटनेला वेळ देता येत नसल्याचे सांगितले आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून तालुका प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या चौथनकरांनी संघटनेच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. चौथनकरांनी राजीनाम्यानंतरही शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले असले, तरी या घटनेमुळे मोताळा तालुक्यातील शिवसेनेच्या राजकीय हालचालींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.तालुका प्रमुखपदाच्या राजीनाम्यामुळे पुढील नेतृत्वाची निवड कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!