बुलढाणा (हॅलो बुलडाणा) खाकी वर्दीला कर्तव्यनिष्ठा ही जपावीच लागते! जनतेसाठी व नेतृत्वाखालील ऑन ड्युटी 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कृतिशील राहून, विविध उपक्रम राबवावे लागतात आणि सेवा घडवावी लागते. अलीकडे वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी एसपी विश्व पानसरे यांनी ट्राफिक पोलिसांना हायटेक प्रशिक्षण देण्याचा संकल्प केलाय.पहिल्या टप्प्यात ट्राफिक पोलीस शाखेचे 32 कर्मचारी मुंबईतील भायखळा येथील प्रशिक्षण संस्थेत दाखल झालेत.
बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एसपी विश्व पानसरे हे नेहमीच झटत असतात. अलीकडे वाढलेली वाहतूक समस्या अधिक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संकल्प केला आहे.त्यामुळे आता वाहतूक शाखेतील पोलिस प्रशिक्षित होणार आहेत. जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलिसांना वाहतूक कोंडी कशी सोडवावी, वाहतूक व्यवस्थापन, सिग्रल यंत्रणा व इतर बाबींचे आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वाहतूक शाखेचे 32 कर्मचारी मुंबईस्थीत भायखळा येथील प्रशिक्षण संस्थेत दाखल झालेत. त्यांना मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन, वाहतूक नियम व इतर बाबींची प्रशिक्षण दिले जाणार आहे.














