बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे हात लंबे आहेत हे प्रत्येकांना मान्य करावेच लागेल. कारण ते क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करीत असतात. याच स्थागूशाखेने दोन आरोपींसह तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. शिवाय त्यांच्याकडून 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करतात करण्यात आला.
21 तीन 2024 च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी माटरगाव येथील सत्यनारायण भुतडा राहणार माटरगाव तालुका शेगाव यांचे श्री हार्डवेअर दुकान फोडून चोरट्यांनी एकवीस तीन 2024 च्या रात्री मोबाईल व रोग रक्कम असा 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत जलम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अशोक लांडे यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमण्यात आले. 24 जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. आरोपी सुपडा सुधाकर खंडारे माटरगाव, दीपक महादेव श्रीराथ माटरगाव व इतर तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्याकडून 83,00 रुपयांचे 6 मोबाईल, रोख रक्कम 25 हजार रुपये असे एकूण 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई एस पी कडसने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र टेकाळे, पोलीस नायक अनंता फरताळे, चालक समाधान टेकाळे या पथकाने केली.