बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेगाव तालुक्यातील टक्कल बाधितांचे प्रकरण राज्यभर चर्चेत आले असून, कोल्हापूर मध्ये एका सलमान नावाच्या पठ्याने केस गळतीवर उपाय शोधला आहे. शेकडो टक्कल बाधितांना हा पठ्ठ्या मोफत जडीबुटी औषध देत असून पुन्हा केस उगवण्याचा दावा करीत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील तब्बल 12 गावांमध्ये आतापर्यंत 203 टक्कल बाधित रुग्ण आढळून आले आहे. पाण्यातील क्षार व नायट्रेट मुळे हा प्रकार घडल्याचे सूत्र सांगत आहेत. दरम्यान या बाधितांसाठी कोल्हापुरात यावर उपाय सापडल्याची बातमी धडकत आहे.परंतु ‘हॅलो बुलढाणा’ या औषधोपचाराची व परिणामांची पुष्टी करत नाही. कोल्हापूर येथील महावीर गार्डन मध्ये अनेक टक्कल बाधितांची गर्दी होत आहे. जवळपास 600 ते 700 लोक इथे उपचार घेण्यासाठी दिसून येत आहेत.केस गळतीवर उपायाचा दावा करणारा सलमान छातीठोकपणे जडीबुडीच्या औषधाने केस उगवण्याचा दावा करीत आहे. बुलढाण्यातील टक्कल प्रकरणावरही तो प्रसार माध्यमांशी बोलला. तो म्हणाला की,पाच वेळा ट्रीटमेंट करावी लागते. जडीबुटीची औषध आहे.साईड इफेक्ट नाहीत. केस गळण्याचे कारण विचारले असता सलमान म्हणाला की, केसाचा एक व्हायरस असला की हा व्हायरस संपूर्ण डोक्यावरचे केस नष्ट करतो परंतु माझ्याकडे मोफत इलाज आहे.या आणि उपचार करा असे आवाहनही त्याने केलं आहे.














