बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आज वीर शिरोमणी हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या 428व्या पुण्यतिथीनिमित्त आज शिवराणा प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सर्क्युलर रोडवरील हिंदुसूर्य महाराणा प्रताप चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला महाराणा प्रताप प्रेमी, शिवराणाप्रेमी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी 9:30 वाजता अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात झाली. बलराज राजपूत, विशाल पवार (राजपूत), भावेश राजपूत, राहुल पिंपळे, पवण खवले, पवन काकडे, शुभम जाधव, शिवम फुले, ओम साताव, रोशन सरसांडे, वीरेंद्र राजपूत, संग्राम राजपूत, विजय काकने, कार्तिक राजपूत, आणि निलेश पोधाडे या तरुणांनी महाराणा प्रतापांच्या शौर्य व स्वाभिमानाचा जयघोष करत वीरगाथांना उजाळा दिला.या प्रसंगी शिवराणा प्रतिष्ठानच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचा जागर करण्यात आला. उपस्थित तरुणाईने त्यांच्या शिकवणीवर चालण्याचा निर्धार केला. कार्यक्रमामुळे चौकात देशभक्तीचा उत्साह जाणवत होता.