spot_img
spot_img

💥घृणास्पद! तिला बाईकवर बसवून लॉजवर नेले.. मग नको ते केले! – कुठे घडली ही दुर्दैवी घटना?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अल्पवयीन मागासवर्गीय विदयार्थीनीस बळजबरीने दुचाकीवर बसवून गावाबाहेरील एका लॉज वर नेत शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक आणि ती तकीच दुर्देवी घटना मेहकर परिसरात घडली आहे. यामुळे मेहकर तालुका हादारला आहे.

प्रकरणी मेहकर पोलिसांनी दोघाविरोधात पोक्सो सह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विध्यार्थिनी शाळेत जात असताना आरोपी नेहमीच तिचा पाठलाग व बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची बालिकेवर वाईट नजर होती. घटना प्रसंगी त्याने आपल्या मित्राच्या मदतीने तिला धमक्या देत बळजबरीने मोटरसायकल वर बसवून गावाबाहेर बायपास वरील निवांत लॉज वर नेले.एका खोलीत नेऊन तिच्या ईच्छेविरोधात शारीरिक अत्याचार केले. याची वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकीही दिली. पिडितेच्या तोंडी तक्रारी वरून मेहकर पोलिसांनी आरोपी मोहन उर्फ राज चव्हाण, (वय २० राहणार खंडाळा, तालुका मेहकर )तसेच ओम प-हाड (वय २० राहणार बाभुळखेड, तालुका मेहकर )या दोघाविरोधात पोक्सो, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केला आहे. मेहकर पोलिसांनी घेऊन्हा दाखल केला आहे. मात्र घटनेचे गंभीर्य आणि पोकसो, ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी नुसार या दुर्देवी घटनेचा तपास
मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत. या घटनेमुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपीना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!