बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे दिव्यांग मोठ्या ‘दिव्या’तून जात आहेत. मात्र जिल्हा यंत्रणा त्यांच्या सशक्तीकरणासाठी झटत नसून स्वतःच कुबडीवर असल्याचे केविलवाणे दृश्य खामगावातच नाही तर बुलढाण्यात देखील आहे. विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन खामगाव येथील दिव्यांग संस्थेने जिल्ह्यात बोगस दिव्यांगांचा प्रश्न उपस्थित केलाय. या संदर्भात त्यांनी संबंधितांना निवेदन दिले आहे. त्यांनी विशेषता दिव्यांगांच्या बोगसगिरीवर बोट ठेवले. बोगसगिरी करणाऱ्या दिव्यांगांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांगाच्या हक्कावर गदा आणणाऱ्या जिल्हा परिषद बुलढाणा व शासकिय विभाग मधिल बोगस दिव्यांगांवर कार्यवाही करावी,दिव्यांग जनगणनाला गती द्यावी,
5% दिव्यांग स्वनीधी देण्यात यावा आदी समस्यांसाठी निवेदन जिल्हाधिकारी व मंत्री महोदयांना देण्यात आले आहे. निवेदनात असेही म्हटले की, बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये काही कर्मचारी,अधिकारी यांनी बोगस अपंग प्रमाणपत्र काढले असून बोगसगिरी करणारे विविध सोई सुविधांचा लाभ घेत आहे.
या अधिकारी कर्मचारी यांचेवर कार्यवाही साठी
मेडिकल बोर्ड एम्स रुग्णालय नागपुर येथे तपासणी करण्यात यावी,
हि तपासणी ईन कॅमेरा करण्यात यावी.तपासणी वेळेस खाजगी तज्ञ डॉक्टर यांचेसह त्याच प्रवर्गातील दिव्यांगा समक्ष करावी, दोषी आढळल्यास त्यांची तत्काळ शासन सेवेप्रमाणे लाभ घेतल्याची वसुली करावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यासह दिव्यांग सुरक्षा कायद्यानुसार कार्यवाही करावी , वास्तविक दिव्यांगाला त्यांचे जागेवर नियुक्तीचे आदेश देण्यात यावे
तसेच त्यांना ज्या मेडिकल बोर्डाने बोगस अपंग प्रमाणपत्र दिले त्यांची चौकशी करत त्यांच्यावरही रितसर कार्यवाही करावी, संपूर्ण राज्यात दिव्यांग जन गणना सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यात या जनगणने ला सुरवात २ झाली नाही.त्याला गती देत घरोघरी जात अंथरुणावर पडलेले विना प्रमाणपत्र धारक व प्रमाणपत्र धारक याची
गणना करण्यात यावी,
ती वास्तव स्वरुपात करण्यात यावी तसेच
ग्राम पंचायत स्तरावर 2023 24 चे रखडलेला 5% निधी वाटप करण्यात यावा. यासह इतरही मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
अन्यथा बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आंन्दोलन करु असा इशारा देण्यात आला. निवेदन देते वेळी विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक,
शेखर तायडे,मो.रईस अब्दुल रशिद,मधुकर पाटिल संतोषभाऊ आटोळे,पुरषोत्तम अग्रवाल,अबदुल राजीक कुरेशी,तानाजी तांगडे,कौसर खान सत्तार खान,मीलींद धुरंधर,पल्लवी पाटिल,कविता ईंगळे,सौ.प्रणिता देवगिरीकर,नीखिल सातव,मनु वानखेडे,सिद्धेश्वर निर्मळ,दिलीप लहुळ,श्यामराव बधे आदी यावेळी हजर होते.
.