मोताळा (हॅलो बुलडाणा) पिंपळगाव देवी यात्रेमध्ये रेवडी बनवण्यासाठी आलेल्या गणपत भोई (रावेर) याचा दारूच्या नशेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. गणपत हा पिंपळगाव देवी यात्रेमध्ये येथील एका स्थानिक व्यापाऱ्याकडे ‘रेवडी’ बनवण्यासाठी आला होता. अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गणपतचा मृतदेह लोणाळी जवळील पहिल्या पुलाखाली काल दुपारी 1.30 सुमारास आढळला.
प्राथमिक तपासात पुलावरून खाली पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी धामणगाव बडेचे पोलीस निरीक्षक नागेश झाईले यांनी तत्काळ पोहोचून पंचनामा केला. या घटनेमुळे पिंपळगाव देवी यात्रेमध्ये खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
पोलीस तपास सुरू असून, मृत्यूमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे










