spot_img
spot_img

ब्रेकिंग: वहीणीच्या मारेकरी दिराला जन्मठेप!श्री स्वप्नील सी. खटी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,बुलडाणा यांचा न्यायनिर्णय

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वहीणीस मारहाण करूण खुन करणा-या आरोपी दिरास जन्मठेप,सश्रम कारावासाची व रू.500 दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजू चिंकाजी गवई असे शिक्षा ठोठावल्याचे नाव आहे.

प्रकरण असे आहे की,
फिर्यादी संतोष चिंकाजी गवई, रा. भादोला ता. जि. बुलडाणा येथे रहात असुन त्याची पत्नी श्रीमती. सौ. बेबीबाई संतोष गवई यांना दोन मुले व तीन मुली आहेत. दिनांक 27/12/2020 रोजी भादोला येथे फिर्यादीच्या
रहात्या घरी बेबीबाई संतोष गवई यानी राजु चिकाजी गवई रा.भादोला ता.जि. बुलडाणा आरोपी विरूध्द चोरीबाबत फिर्याद दिली होती व त्यावरून
आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला होता या कारणावरून आरोपी याने त्याची वहीणी नामे सौ. बेबीबाई संतोष गवई हिस तिच्या राहत्या घरी लाकडी दाडयांने डोक्यावर मारहाण केली. त्यामुळे सौ. बेबीबाई संतोष गवई हिच्या डोक्यातुन रक्तस्त्राव सुरू होता. त्यावेळी साक्षीदार संदीप गवई हा तेथे गेला असता व सौ. बेबीबाई संतोष गवई हिस तिला काय झाले या बददल विचारले असता तिने सांगीतले की, राजु गवई याने मारले व त्यानंतर तिला उपचारासाठी सरकारी दवाखाना बुलडाणा येथे भरती केले.अश्या रीपोर्ट वरून आरोपी राजु गवई याचे विरूध्द कलम 307 भा.द.वी नुसार पोलीस स्टेशन बुलडाणा ग्रामीण येथे अपराध क. 460/2020 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दिनांक 28/12/2020 रोजी सौ. बेबीबाई संतोष गवई हया औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात मयत झाल्या. त्यामुळे सदर गुन्हयामध्ये कलम 302 व कलम 452 आरोपी विरूध्द समाविष्ट
करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास सर्वप्रथम पी. एस. आय रामपुरे,तसेच पी. आय नवलकर त्यानंतर उप विभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी करून आरोपीविरूध्द भरपूर पुरावा मिळून आल्यामुळे
दोषारोपपत्र बुलडाणा येथील न्यायालयामध्ये दाखल केले.
त्यानंतर सदरचे प्रकरण हे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री बुलडाणा यांचेकडे सरकारपक्षाची बाजू मांडण्याकरीता सोपवण्यात आले. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. पैकी
साक्षीदार संदिप गवई यांचा पुरावा महत्वाचा ठरला. कारण बैबीबाई हिने ती मरण पावण्या अगोदर साक्षीदार संदिप गवई यांना तिला राजुने मारल्याबाबत
सांगीतले. त्याबतीत साक्षीदार संदिप गवई यांचा पुरावा विशेष ठरला. त्याचप्रमाणे ईतर परिस्थितीजन्य पुरावाच्या आधारे सरकारी वकील अॅड. संतोष
खत्री यांनी प्रखर युक्तीवाद सादर केला. सदर प्रकरणामध्ये आरोपीचा बचाव होता की, मयत बैबिबाई हया त्याच्या घराच्या टीणावरून लाकडे काढत असताना पडल्या व त्यामुळे बैबीबाईच्या डोक्याला जखम झाल्याबाबत आरोपींच्या विधीज्ञांनी युक्तीवाद केला. यावेळी श्री. स्वप्नील सी. खटी
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलडाणा यांनी कलम 310 सी.
आर. पी. सी नुसार घटनास्थळाचे अवलोकन करण्याकरीता आदेश पारीत केला व त्यानुसार सरकारी वकील तसेच आरोपींचे वकीलाना त्याबाबत नोटीस देवुन प्रत्यक्षरीत्या घटनास्थळाचे अवलोकन केले. आता प्रर्यतच्या
बुलडाणा न्यायालयाच्या ईतिहासामध्ये सर्वप्रथम हि बाब घडलेली आहे.त्यानुसार मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलडाणा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाचे अवलोकन केले व त्याबाबतीत मेमोरडम सुध्दा तयार करण्यात आले. यावरून सुध्दा मा. न्यायालयाने आरोपींच्या वकीलाचा बचाव योग्य नसल्याबाबत सुध्दा न्यायनिर्णयामध्ये उल्लेख केला. या वरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, स्वप्नील खटी बुलडाणा यांनी आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द होत असल्याकारणाने
आरोपी राजु चिंकाजी उर्फ चिनकाजी गवई यांना कलम 302 भा.दं.वि.मध्ये आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा व रू.500/- दंड ठोठावला. दंड न
भरल्यास 2 वर्षापर्यत्न सश्रम कारावासची शिक्षा ठोठावली. आरोपी राजु चिंकाजी उर्फ चिनकाजी गवई यांना कलम 452 भा.दं.वि.मध्ये 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रू.500/- दंड ठोठावला. दंड नभरल्यास 6 महीण्या पर्यत्न सश्रम कारावासची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री बुलडाणा यांनी कामकाज पाहले.सदर गुन्ह्याचा तपास श्री बरकते साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाणा H.C संदीप मिसाळ bn 2047, नीलेश झगरे bn 935 यांनी केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!