बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील दोन डॉक्टरांचा वाद चक्क पोलीस ठाण्यातच पोहोचला.घरातील वीज प्रकारावरून हा गोंधळ उडाला.झाले असे की, याप्रकरणी
अप क्रमांक 40/2025 कलम 333, 115, 352, 351 (2) (3) BNS गुन्हा नोंद झाला आहे.डॉ. यशवंत तुकाराम चवरे यांनी
डॉ.अक्षय विजय टेकाळे विरोधात तक्रार दाखल केली.डॉ. यशवंत तुकाराम चवरे यांच्या मालकीचे दिविशा अपार्टमेंटमधील गाळाधारक म्हणून डॉ.अक्षय विजय टेकाळे राहतो.दरम्यान अक्षय याने घरात घुसून तुमच्या विद्युत मीटर वरून वीज का देत नाही? म्हणून वाद घातला. लोटपोट केली,शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.त्यांचे वडील विजय टेकाळे हे सुद्धा माझ्या अंगणात आले होते.अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.