spot_img
spot_img

💥सहज सुचलं म्हणून.. बाळरोग तज्ञ डॉ. योगेश शेवाळे यांच्या लेखणीतून.. “पंगत बसलेली आहे..!”

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पंगतीमध्ये जेवणाचा खरा आनंद म्हणजे मस्त पैकी जमिनीवर खाली मांडी घालून, बसून जेवण्यातच ….लहानपणी आमच्या गावांमध्ये चुलबंद आवतण असायचं …म्हणजे जेवायला मोजून पाहुणे नाही तर घरात असलेल्या सगळ्यांना चुलबंद आमंत्रण ….जेवणाचा मेनू एकदम साधा आणि वाढायला सोपा ….कुठलीच उच-नीच नाहीच …

गावपंगत असली म्हणजे जेवणाच्या गल्ल्या तुर्हाट्यानी झाडून …पाण्याचा सडा मारून सज्ज व्हायच्या ….पंगतीमध्ये ताट पेला ( परात तांब्या )नायलॉन च्या थैलीत घरून घेऊन जाण्याचा अलिखित नियम राहायचा काहि ठिकाणी …
डाहाळ्याच्या / पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या आणि द्रोण सर्वाना दिले कि सगळ्यात आधी पान आणि द्रोण धुवून पत्रावळीच्या आजू -बाजूला परत पाणी मारायचं ….बऱ्याच वेळा द्रोण नसायचे
मग जगविख्यात “आळं ” तयार करायला लागायचं …
आळ तयार करण्याची कला gen -z ला कळणार नाही म्हणून मुद्दाम सांगतो …
पत्रावळी वर वाढलेल्या पोळीचे काठ गोल काढून घेऊन बाकी पोळी मस्त पैकि हातावर मळून बारीक करायची ….या ढिगाराला मध्ये गड्डा करायचा ….आतून बाहेरून भाताचा एक लेअर सपोर्ट म्हणून टाकायचा आणि मग गोलाकार कापलेला पोळीचा काठ मस्तपैकि आळ्याच्या आतल्या बाजूने भिंत म्हणून लावायचा आणि मग या मध्ये गरम गरम वरण वाढल्या जायचे ….काय बिशाद हे आळं leakage व्हायची ….एकदम perfect आळं ..
नंतर वाढलेल्या पोळी सोबत वांग्याची भाजी, बुंदी /वडी /लाडू आणि बाकीचा दांगडो खायचा …
ह्या ऐरावती थाटाची मिसाज बुफ्फेट आणि caterring ला नाहीच मुळात !!
पंगतीतल्या वांग्याचा भाजीची मज्जा 100 मास्टर शेफ लावले तरी येत नाही ….लिहितानाही तोंडाला पाणी सुटलं …
पंगती मध्ये वरणामध्ये साधन (तूप/ वनस्पती घी )वाढणारा एकदम जबाबदार व्यक्ती असतो …त्याला चुल्हीच्या आहाराजवळच standing instructions दिलेले असतात …तो एव्हडा फास्ट तूप वाढत समोर जातो कि विचारू नका …पोळीचा तुकड्याने साधन वाढून गेला कि तो पुन्हा जेवण होई पर्यंत दिसत नाही …एकदम गायब …डायरेक्ट चुलीजवळच्या आहाराजवळ दिसणार परत ….त्याने एखद्याला साधन वरनाशिवाय जर पोळीवर वाढलं कि समजायचं तो vip माणूस आहे …जावई किंवा मोठा पाहुणा …
पंगतीमध्ये वरण वरण …उदक उदक( पाणी ) ….वाढणारे आले कि सहज नजर त्या साधन वाढणाऱ्याला शोधत असतेच …
पंगतीमध्ये बसलेले “वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे” म्हणत” पुंडलिकाच्या “नावाने जेवणाची सुरुवात करतात ….मध्ये मध्ये जोश वाढण्यासाठी श्लोक म्हणणारे महाराज पंगतीमधुन फिरत असतात …
सगळ्यांचे जेवण झाल्याशिवाय कुणीच उठत नाहीत ….
आता येते खरी मज्जा !!
आळ करताना ज्यांनी भरमसाठ मोठा काला केलेला असतो त्याची होते पंचायत …..सगळे जण डोळे टवकारून त्याच्या कडे पाहत असतात ….पाहुणे होऊ द्या आरामशीर! …काही आणायचा का आजून! ….काही घाई करू नका! …अशा टोमणे वजा सूचना यायला लागतात …
वाजवी पेक्षा जास्त वाढून घेतलं कि हालच हाल ….आयुष्याचंही असाच काही आहे …किती गरजेचं आहे आणि कुठं थांबायचं हे समजणं खूप आवश्यक आहे ….शिल्लक असलेलं बरच काही खरं तर अनावश्यकच ….
सगळ्यात शेवटची पंगत हि सगळ्या आयोजकांची …सगळ्यांची जेवणं झाली कि बसणारी हि “गोल्डन पंगत” …डेकि मधील चवदार घट्ट वरण ..भरभरून साधन आणि तर्ही वाली वांग्याची भाजी ….बोले तो एकदम झक्क्कास !!
गोविंदा आणि करिष्मा कपूर यांचे “सातो जनम तुझको पाते गोरी तेरे नैनो मे हम बस जाते “,
आणि ,
अल्ताफ राजा यांचे
“तुमतो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे “हे गाणे ऐकत ऐकत वांगे विळ्यावरती चिरत सुरु झालेली पंगत ;गोल्डन पंगती पर्यंत कधी येऊन पोहोचते कळतही नाही …
मॉडर्न buffet आणि sophisticated cattering हे खरं म्हणजे एक वेगळं जग …..पण ecofriendly ,सात्विक आणि समाजच्या सगळ्या घटकांना सामावून घेणाऱ्या पंगतीचा आणि त्या अळ्यांचा हा थाट काहीतरी वेगळाच !!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!