बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा येथील पत्रकार भवनात उद्या, १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘अभिवादन माँसाहेबांना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहर पत्रकार संघाच्या पुढाकाराने होणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. वैशाली निकम जिजाऊ माँसाहेबांच्या जीवनावर मार्गदर्शन करणार आहेत. विशेष अतिथी म्हणून बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे, शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले, दैनिक महाभूमीचे कार्यकारी संपादक ब्रह्मानंद जाधव आणि अजिंक्य भारतचे पत्रकार गणेश निकम उपस्थित राहणार आहेत.
जिजाऊ माँसाहेबांच्या आदर्शांचा जागर घडवण्यासाठी शहरातील तमाम नागरिकांनी, पत्रकारांनी आणि जिजाऊप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.