देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) खडकपूर्णा धरणाच्या पाण्यातील मोटार बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या इसमाला जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना घडली. संजय जनार्दन शिंगणे वय 47 रा. देऊळगाव मही असे मृतकाचे नाव आहे.ही घटना गारखेड शिवारात घडली.
या घटनेबाबत गजेंद्र शिंगणे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांचे चुलत भाऊ
मृतक संजय जनार्दन शिंगणे हे देऊळगाव मही येथील असून ते गारखेड शिवारातील खडकपूर्णा धरणाच्या पाण्यात पाणी उपसा करणारी मोटार बाहेर काढण्यासाठी धरणात उतरले होते.दरम्यान पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांचा पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे.














