spot_img
spot_img

💥BREAKING! बुलढाण्यात पहिल्यांदाच ‘म्हातारा’ तब्बल 15 दिवस डिजिटल अरेस्ट! – तब्बल 28,30,000 रुपयांची आर्थिक फसवणुक!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) इंटरनेटचा आयुष्यात शिरकाव झाल्यामुळं आयुष्य सोपं झालं आहे, पण त्याचबरोबर अडचणींमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाइन घोटाळ्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हे घोटाळेबाज वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. डिजिटल अरेस्ट हा आता त्यात एक नवीन प्रकार उदयाला आला आहे.बुलढाण्यात देखील एका वृद्धाला डिजिटल अरेस्ट झाली आहे.वृद्धाची तब्बल 28,30,000 रुपयांनी आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे.

बातमी अशी की, एक वृध्द इसम हातामध्ये थैली घेवून त्यामध्ये त्यांचे शेतीचे कागदपत्रे घेवुन बुलढाणा परीसरात फिरत होते.त्यांना अर्जंन्ट ती शेती विकून किंवा त्यावर लोन घेवून पैशांची गरज होती. ते त्यांचे मित्रांना
भेटले परंतू काय गडबड आहे हे ते कुणालाही सांगु इच्छीत नव्हते. त्यानंतर त्यांचे अश्रु आणि भिती बघुन त्यांच्या मित्रांना काही गडबड असल्याचा संशय आला ते लगेच त्यांना बुलढाणा सायबर पोलीस स्टेशन येथे घेवून गेले तेथे
पोहचले असता पिडीत वृध्द इसम यांनी सायबर पोलीसांना सांगीतले की, मी
डिजीटर अरेस्ट मध्ये आहे माझे जवळ जास्त वेळ नाही मला तत्काळ घरी जाऊन त्यांना रिपोर्ट करावा लागेल. सायबर पोलीसांनी त्यांना धिर देवून त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस
केली असता लक्षात आले की, सदर चे वृध्द इसम यांना 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी व्हिडीओ कॉल आला. त्यामध्ये समोरची व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशामध्ये होती त्याने वृध्दाला सांगीतले की, ‘आपके फोन
नंबर को संदीग्ध पाया गया है आपके मोबाईल नंबर से मनी लॉन्ड्रीग हो रही है’ तसेच पोर्नोग्राफी संबधाने आपल्यावर बरेच गुन्हे दाखल झालेले आहेत. आता आपण चॉईस करा की आपल्याला पोलीसांनी घरी येवुन अटक करावी की, आपण डिजीटल अरेस्ट करीता तयार आहात. त्यावर वृध्दाने
डिजीटल अरेस्ट करीता होकार देताच त्यांचे डिजीटल अरेस्ट सुरु झाले

त्यानंतर त्यांना सतत व्हिडीओ कॉल सुरु ठेवण्यास सांगीतले गेले. सतत व्हिडीओ कॉल सुरु असल्याने सदरचे वृध्द यांचा डाटा संपत असल्याने फ्रॉडस्टरांनी त्यांना 30 जीबीचे रिचार्ज करण्यास सांगीतले व रिचार्ज करुन
येताच त्यांना रिपोर्ट करण्यास सांगीतले व ही बाब कुणाला सांगीतल्यास त्यांचेवर पण कारवाही करण्याचे पिडीतास सांगण्यात आले अशा प्रकारे सायबर फ्रॉडस्टरांनी सदर वृध्द इसम यांना धमकावुन त्यांना डिजीटल
अरेस्ट करुन त्यांचे कडुन एकुण 28,30,000 रुपये उकळले. यावरच सायबर फ्रॉडस्टर थांबले नाहीत तर त्यांनी सदर वृध्द इसम यांना व्हिडीओ कॉल करुन त्यांचे डॉक्यूमेंन्ट व्हेरीफीकेशनचे नावावर व्हिडीओ कॉलवरच त्यांचे कागदपत्रे बघितले. त्यामध्ये सदर वृध्द यांचे शेतीचे कागदपत्रांवर सदर
फ्रॉडस्टरांची नजर पडली व ‘अभी ये खेती बेच दो और हमे पैसे ‘ असा तगादा लावला म्हणून सदरचे वृध्द हे त्यांना रिपोर्ट करुन शेतीचे कागदपत्रे घेवून शेती विकण्यास घराबाहेर पडले शेती विकण्या करीता मित्रांमध्ये गेले असता त्यांचे मित्रांचे लक्षात आले की, काही तरी गडबड आहे व नंतर लगेच मित्रांनी सदर वृध्द इसम यांना सायबर पोलीसांकडे घेवुन गेले सायबर पोलीसांनी सदर वृध्द इसम यांना विश्वासात घेवुन त्यांचे समुपदेशन करुन त्यांना विचारणा केली असता सदर वृध्द ईसम यांनी पोलीसांना आपबिती सांगीतली त्यानंतर लगेच सायबर पोलीस स्टेशन येथे डिजीटल अरेस्ट
बाबत 28,30,000 रुपये आर्थिक फसवणुकीचा विवीध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सायबर पोलीस पुढील तपास करीत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!