spot_img
spot_img

‘तारेवरच्या कसरतीला’ पावसाळ्यातही गती!- बुलडाणा जिल्ह्यातील या गावांवर राहील विशेष लक्ष- ग्राहकसेवेची काळजी घेण्याचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांची निर्देश

बुलढाणा ( हॅलो बुलढाणा) पावसाळ्याला सुरूवात झाली आहे,मान्सुनपूर्व देखभाल दुरूस्तीचे उर्वरीत कामे तत्काळ पुर्ण करा.तसेच ग्राहकसेवा, विजपुरवठा आणि वीजबिल वसुलीवर परिणाम होणार नाही,यानुसार आगामी काळात काम करावे लागणार असे निर्देश मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी दिले. अकोला परिमंडळात बदली झाल्यानंतर पदभार स्विकारताच मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी परिमंडळा अंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्याची व्हिडीवो कॉन्फरंन्सव्दारे बैठक आयोजित करून परिमंडळाचा आढावा घेतला.यावेळी अधीक्षक अभियंते पवनकुमार कछोट,सुरेंद्र कटके,अजय शिंदे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख,उपविभागीय अभियंते या बैठकिला उपस्थित होते. वसुली हा महावितरणचा आत्मा असल्याने ग्राहक सेवा बाधित न होता वसुलीला गती देण्याचे निर्देश देतांना अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी,पातुर,अकोला शहर-१, तेल्हारा या उपविभगासोबत बुलडाणा जिल्ह्यातील धाड,सिंदखेड राजा,खामगाव ग्रामीण,मेहकर,मोताळा,वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि रिसोड उपविभागात विशेष लक्ष देण्याची गरज आहे,त्यामुळे संबंधित उपविभागीय अभियंता यांनी दिलेल्या टार्गेटनुसार कामाला गती देण्याचे यावेळी त्यांनी निर्देश दिले. वीज ही अत्यावशक सेवा आहे. त्यामुळे नविन वीज जोडणी देतांना महावितरणच्या माणकांचे पालन करावे , तसेच मुख्य कार्यालयाने दिलेल्या उध्दीष्टानुसार लघुदाब वीज खांबाचे GIS मॅपींग पुर्ण करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!