मेहकर (हॅलो बुलडाणा) सुरूवातीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगला महत्त्व नसल्याने सर्व प्रकारची खरेदी स्थानिक व्यापाऱ्यांकडे होत होती व बाजारपेठेत चांगल्या प्रकारे आर्थिक उलाढाल होत होती. परंतु गेल्या काही वर्षात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण शहरी भागासह ग्रामीण भागात देखील वाढल्याने मेहकरच्या बाजारपेठेवर ऑनलाईन शॉपिंगचा दुष्परिणाम दिसून येत आहे.
अमेझॉन,फ्लिपकार्ट,मिशो, नायका,मिनत्रा अशा हव्या असले विविध ई- कॉमर्सच्या माध्यमातून मेहकर शहरातून दररोज तब्बल
दिवसाला 1 कोटी रुपये बाहेर जात असल्याने सदर पैसा मेहकरात खेळता राहत नाही.त्यामुळे ही बाब शहर विकासासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. मेहकर शहर हे मुंबई ते नागपूरचे मध्यवर्ती केंद्र आहे.मेहकरचा शारंगधर बालाजी, जवळ असलेले जागतिक दर्जाचे लोणार सरोवर आणि शहराला लागून गेलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
समृद्धी महामार्ग, छत्रपती संभाजी नगर, पुणे, तर जवळच असलेला मराठवाडा यामुळे मेहकरचा झपाट्याने विकास होत आहे.परंतु शहरातील जनता खाण्यापिण्याच्या साहित्यासह इतरही आवश्यक साहित्य ऑनलाईन मागवीत असल्याने दर दिवसाला 1 कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.त्यामुळे मेहकरातील पैसा गायब होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.














