बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या निमित्त आगमन करणारे कुणीही अधिकारी हार तुरे आता आणू शकणार नाहीत! तसा आता आदेश निघाला आहे.शिवाय ते पोलिसांची मानवंदना देखील स्वीकारणार नाही.
मुख्यमंत्र्यांचा दौरा असला की, कोणीही अधिकारी असो, त्यांच्याकडून पुष्पगुच्छ किंवा हार आता स्वीकारल्या जाणार नाही, याबाबतचा आदेश 2 जानेवारीला जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रत्येक जिल्ह्यात दौरे असतात. पुष्पगुच्छ आणि हारतूरें देण्यासाठी प्रत्येकांची गर्दी होते.त्यामुळे या प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्र्याना मानवंदना पोलीस दलाकडूनही देण्यात येत असते.परंतु ती देखील प्रथा बंद करण्यात आल्याचे निर्देश देण्यात आले आहे.