बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नवीन वर्ष 2025 मध्ये जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी 3 स्थानिक सुट्ट्या घोषित केल्या आहेत.20 फेब्रुवारी गजानन महाराज प्रकट दिन,30 एप्रिल अक्षय तृतीया आणिएक सप्टेंबर 2025 रोजी ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सुट्टी घोषित केली आहे.हा आदेश जिल्ह्यातील दिवाणी फौजदारी न्यायालय व अधिकोष यांना लागू होणार नाही.
नवीन वर्ष लवकरच येत आहे. या निमित्ताने अनेकांना पुढच्या वर्षी किती सुट्ट्या मिळणार हे पाहण्याची उत्सुकता असते, नवीन वर्षाचे कॅलेंडर आले की सर्वात आधी आपण गणपती, दिवाळी, वाढदिवस, असे महत्त्वाचे सण हे सगळ्यात पहिल्यांदा पाहतो. तर यंदा 2025 मध्ये गुढी पाडवा, रामनवमी, मोहरम आणि प्रजासत्ताक दिन यांसारखे सण रविवारी येणार आहेत.अशात जिल्हाधिकारी यांनी स्थानिक 3 सुट्ट्या एक जानेवारीला नवीन वर्षी बुलढाणा जिल्ह्यासाठी जाहीर केल्या आहेत.