बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भाजपाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभ्यासू, मितभाषी व अतिशय मेहनती स्वभावामुळे जिल्ह्यातील जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले डॉ. मांटे यांनी बुलढाणा जिल्ह्यात भाजपाच्या वाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये भाजपाचा झेंडा अभिमानाने फडकत ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पक्षाच्या तत्त्वांना धरून ठेवत त्यांनी संघटनात्मक बांधणीसाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण झाले आहे.डॉ. गणेश मांटे हे केवळ राजकीय नेते नसून एक मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत सोबतच. त्यांच्या कार्यशैलीतून स्वच्छता, पारदर्शकता आणि समर्पण यांचा आदर्श दिसून येतो. त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे ते कार्यकर्ते व जनतेमध्ये अधिक प्रिय आहेत.
भाजपाचे बुलंद नेतृत्व करणाऱ्या डॉ. गणेश मांटे यांना त्यांच्या जन्मदिवशी पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी व जिल्ह्यातील जनतेने शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होऊन नवा इतिहास रचेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे.
“आपल्या कार्यतत्परतेने सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. गणेश मांटे यांना टीम ‘हॅलो बुलडाणा’ कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”