spot_img
spot_img

“पत्रकारांचे मातृसंस्थान” – चिखली संघाची नव्या दमाची कार्यकारिणी तयार! दमदार जिल्हाध्यक्षांचे मार्गदर्शन!

चिखली (हॅलो बुलडाणा / सैय्यद साहिल) पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित चिखली तालुका पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक शासकिय विश्राम गृह येथे संपन्न झाली. यावेळी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष रणजितसिंह राजपूत, उपाध्यक्ष संतोष लोखंडे, कार्याध्यक्ष वसीम शेख, सरचिटणिस कासिम शेख, सहसचिव शिवाजी मामलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर मावळते अध्यक्ष योगेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी चिखली तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी सर्वानुते अविरोध घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी नितीन फुलझाडे, उपाध्यक्षपदी भिकू लोळगे, सचिवपदी महेश गोंधणे , कोषाध्यक्षपदी छोटू कांबळे , सहसचिवपदी रमीज राजा, संघटकपदी भरत जोगदंडे यांची निवड करण्यात आली.

सर्वप्रथम बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या नविन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात येवून त्यांच्याकडून चिखली तालुका पत्रकार संघाच्या नविन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
तर याप्रसंगी बुलढाणा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह राजपूत, वसिम शेख, कासिम शेख, संतोष लोंखंडे, शिवाजी मामलकर यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.
यावेळी संघाचे ज्येष्ठ सदस्य मनोहर गायकवाड, संतोष लोखंडे , कैलास शर्मा, नितिन गुंजाळकर , रेणूकादास मुळे, कैलास गाडेकर, इफ्तेखार खान, योगेश शर्मा, गणेश सोळंकी, रमाकांत कपूर , रवींद्र फोलाने, छोटू कांबळे, कमलाकर खेडेकर, भिकू लोळगे, सत्य कुटे, महेश गोंधणे,सैय्यद साहिल,भरत जोगदंडे , साबीर शेख, रमिज राजा,इम्रान शाह आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य स्व.गिरीष शिरभाते यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तर शेवटी राष्ट्रगिताने या सभेची सांगता करण्यात आली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!