देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) ‘हॅलो बुलडाणा’ ने वाळू तस्कर ‘पुष्पा’ विरोधात नुकतीच बातमी प्रसारीत केली आणि यंत्रणा सावध झाली आहे. दरम्यान देऊळगाव मही ते बायगाव रस्त्यावर दि. 30 डिसेंबर ला रात्री 10.30 वाजता च्या दरम्यान, प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांचे पथकांनी अवैध रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या प्रत्येकी 4 ब्रास चे दोन ट्रक वर जप्तीची कारवाई केली, सदर ट्रकवर क्रमांक नाहीत, सदर दोन्ही ट्रक पोलीस स्टेशनं देऊळगाव राजा येथे अटकावं करून ठेवण्यात ठेवण्यात आले आहेत, दोन्ही ट्रक वर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच दोन्ही ट्रकवर क्रमांक नसल्यामुळे त्याच्यावर मोटार वाहन अधिनियमा नुसार कार्यवाही करण्यासाठी आर टी ओ यांचे कडे पाठविण्यात येणार आहे
सदर पथकामध्ये प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांची सोबत एस जी पांडव, व्ही यु कटारे, एस ए जाधव महसूल ग्राम अधिकारी, एल एन वायडे, मंडळ अधिकारी, तसेच पोलीस स्टेशन देऊळगाव पोलीस विभागाचे कर्मचारी सोबत होते.
गारवा हॉटेल परिसरात व देऊळगाव मही परिसरामध्ये 24 तास पथक कार्यान्वित ठेवावे असे निर्देश तहसीलदार देऊळगाव राजा यांना देण्यात आले.