बुलढाणा (हॅलो बुलडाणा) चोरी करणं हा कायद्यानं गुन्हा आहे.जर तुम्ही पकडला गेलात तर तुम्हाला गंभीर शिक्षा होऊ शकते. मात्र हे माहित असताना देखील काही लोकं झटपट पैसे कमावण्याच्या इराद्यानं चोरीचा रस्ता निवडतात. असाच रुपेंद्र नरसिंग पठ्ठे रा.संत रोहिदास नगर मलकापूर जि. बुलढाणा याने तब्बल 9 दुचाकी चोरून ‘धूम’ केली खरी पण अखेर खामगाव पोलिसांच्या हाती लागल्याने आता त्याला जेलचा प्रवास जड जाणार आहे.
भरदिवसा ऐन रहदारीच्या रस्त्यावरील चौकातून दुचाकींचे लॉक तोडून या चोरट्याने 9 दुचाकी लंपास केल्या आहेत.या चोरट्याचा शोध लावण्यासाठी खामगावचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी अधिनस्त स्वतंत्र पथक तयार केले होते. पेट्रोलिंग करत असतांना आरोपी हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकल MH-04-KY- 7256 ची डुब्लीकेट चावी बनवितांना मिळून आला.चौकशी दरम्यान आरोपी
याने तब्बल 9 मोटार सायकली चोरल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई एसपी विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.आरोपी जेलची हवा खाणार असून, खूपच ‘मासूम’ दिसून येत आहे.










