चिखली (हॅलो बुलडाणा) आज संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी चिखलीत सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला असून शेकडोंचा जनसागर लोटल्याचे चित्र दिसून आले. संतोष देशमुख यांच्या आरोपीला ‘कठोर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे!’ या मागणीने परिसर दणाणून गेला होता.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आज अनेक दिवस झालेत. या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी संताप व्यक्त केला आहे, या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत, त्याच्या निषेधार्थ आज चिखली मध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात लोक हातामध्ये छोटे-छोटे पोस्टर घेऊन संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करत होते, शेकडो लोक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आहे.