बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकारितेतील संघटनात्मक पर्व सुरु झालेय. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी रणजीतसिंग राजपूत यांची निवड झालीय तर सरचिटणीस पदी कासिम शेख यांची निवड करण्यात आली आहे.
येथील पत्रकार भवनात आज 29 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष पदी चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सूचक म्हणून गजानन राऊत यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी रणजीतसिंग राजपूत यांचे नाव सुचवले. तेव्हा सर्वांनी एकमताने त्यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला.
मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी रणजीतसिंग राजपूत, सरचिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, वसिम शेख, चिटणीस यशवंत पिंगळे, महिला जिल्हाध्यक्ष कु.मृणाल सोमनाथ सावळे, सोशल मिडीया जिल्हा प्रमुख संजय जाधव, उपाध्यक्ष संतोष लोखंडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी अधिस्विकृतीधारक पत्रकार समितीचे विभागीय सदस्य राजेंद्र काळे, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, डिजीटल मिडीया परिषदचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार भावना समोर आतिषबाजी करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.