बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दुकानदार विकलेला माल परत घेण्यास नकार देऊ शकत नाही.वस्तू सदोष असल्यास किंवा ग्राहकाच्या गरजांशी जुळत नसल्यास, खरेदीदारास ते परत करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आता एकदा विकलेली वस्तू परत घ्यावी लागणारच असा नियम पक्का झाला आहे.
एका परिपत्रकानुसार, ग्राहकाला कोणतीही वस्तू ज्या स्वरूपात दुकानातून किंवा मॉलमधून खरेदी केली होती. त्याच स्वरूपात परत करण्याचा अधिकार आहे. दुकानदार किंवा मॉल व्यवस्थापन ते परत घेण्यास बांधील आहेत.
अनेक ग्राहक न्यायालयांनीही यासंदर्भात वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. ग्राहक कायद्यानुसार दुकानदाराने विकलेला माल परत घेण्यास नकार दिल्यास ग्राहक न्याय मागू शकतो. यामध्ये दोषी आढळल्यास दुकानदाराला दंड आणि शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.