मेहकर (हॅलो बुलडाणा) मेहकरसह बुलढाणा जिल्ह्यात बोगस प्रमाणपत्राचा आधार घेऊन एसटीला चुना लावणाऱ्या ठगांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.या गंभीर बाबीकडे लोणारचे वाहतूक नियंत्रक एस पी तेजनकर यांनी मेहकर आगार व्यवस्थापकांच्या आदेशावरून लक्ष वेधले असून,बस स्थानकावरील सर्व बसेस चेक करून बोगस आधार कार्ड व वन फोर कार्ड जमा करून आगारात तपासणीसाठी देण्यात येत आहे.दरम्यान बोगस पासधारकांचे धाबे दणाणले आहेत.
बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटीत सवलत घेणार्या ठगांचा समाजकल्याण विभाग शोध घेत नाहीत.यासाठी राज्य परिवहन विभाग, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अभियान सुरू करायला हवे! अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे बस प्रवासासाठी सवलत घेणार्यांची संख्या जास्त असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. भरारी पथक सक्रिय दिसून येत नाही.
एसटी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बरेचजण बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवास करत असल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.दरम्यान मेहकर आगार व्यवस्थापक यांच्याकडून डुप्लिकेट कार्ड जमा करण्याची मोहीम सुरु झाली आहे.एसटीच्या
सवलतीमध्ये प्रामुख्याने अमृत महोत्सव या योजनेमार्फत 75 वर्षा समोरील नागरिकांना मोफत प्रवास,65 वर्षा समोरील ज्येष्ठांना अर्धे तिकीट व दिव्यांग व्यक्तींना वन फोर तिकिटाच्या डुप्लिकेट कार्ड चे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वापर सुरू असताना दिसून येत असल्यामुळे मेहकर आगार व्यवस्थापक हर्षल साबळे यांनी 24 डिसेंबर रोजी एका लेखी आदेशाने वाहतूक नियंत्रकांना बोगस कार्ड जमा करण्याचे आदेश दिलेत आणि 25 डिसेंबर व 26 डिसेंबर रोजी लोणार बस स्थानकामध्ये वाहतूक नियंत्रक राजू सानप, शकील खान, संजय राठोड, सतीश पाटिल तेजनकर, जयदिप नेवरे, व चालक तेजराव तेजनकर, संदिप इंगोले सह लोणार ग्रुपला कामगिरी करणारे सर्व चालक वाहक यांच्या टीमने प्रत्येक बसमधील प्रवाशांची डुबलीकेट कार्डची तपासणी केली. त्यामुळे या मोहिमेचे कौतुक होत आहे.
▪️वाहतूक नियंत्रक एस.पी.तेजनकर
काय म्हणाले?
आमचे वरिष्ठ अधिकारी आगार व्यवस्थापक श्री साबळे साहेब यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेल्या आदेशाचे पालन करून आम्ही लोणार बस स्थानकावर सर्व बसेस चेक करून डुबलीकेट आधार कार्ड व वन फोर कार्ड जमा करून आगारात जमा करून देत आहोत आगार व्यवस्थापकांच्या या निर्णयांचे सर्वत्र स्वागत होत असून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे प्रत्येक बस मधील अनेक प्रवाशांकडे डुबलीकेट कार्डचे प्रमाण दिसून येत आहे.सर्व कर्मचाऱ्यांकडून सुद्धा या निर्णयाचे स्वागत होत आहे.