बुलढाणा (हॅलो बुलढाणा)
‘क़दम मिला कर चलना होगा!
बाधाएँ आती हैं आएँ
घिरें प्रलय की घोर घटाएँ,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ,
निज हाथों में हँसते-हँसते,
आग लगाकर जलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।’
ही काव्यरचना आहे देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची! त्यांच्या जयंतीनिमित्त आज बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथील त्यांच्या समाधीस्थळावर अभिवादन केले.
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची 25 डिसेबरला जयंती साजरी केली जाते. त्या निमित्य एन डि ए च्यावतीने दिल्ली येथील “सदैव अटल” या समाधीस्थळावर आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळीच केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.