spot_img
spot_img

💥मागणी! संत चोखामेळा यांच्या जन्मोत्सवाचे सामाजिक न्याय मंत्री ना.संजय शिरसाट यांना निमंत्रण! -डॉ.शशिकांत खेडेकर म्हणाले.. ‘संत चोखामेळा यांच्या नावाने सुरू झालेल्या पुरस्काराची घोषणा त्वरित करा!’

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा /संतोष जाधव)आपल्या अभंगवाणीतून प्रबोधन करणारे विठ्ठलाचे निस्सीम भक्त संत चोखामेळा यांचे मेहुणा राजा हे जन्मस्थळ वर्षानुवर्ष उपेक्षितच आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी 14 जानेवारीला चोखामेळा जन्मोत्सव साजरा केल्या जात आहे मात्र जन्मोत्सव सक्तीचे भक्त आणूनच दरवर्षी हा उत्सव साजरा केल्या जातो अलीकडच्या काही वर्षात जन्मस्थळ विकासाच्या हालचाली सुरू झाल्या कित्तेक वर्ष झाडाखाली चोखामेळा यांची मूर्ती उघड्यावरच होती वारंवार मागणीनंतर मंदिर निर्माण करून डोक्यावर छत्र उभारल महायुती सरकार असतांना तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री यांनी संत चोखामेळा यांच्या नावाने शासनाकडून राज्यस्तरीय पुरस्कार देण्याची परंपरा त्यांच्या जन्मभूमीतूनच मी सुरू केली

मात्र मागील काही वर्षापासून सामाजिक न्याय विभागाला या पुरस्काराचा विसर पडला सामाजिक न्याय विभागाला संत चोखामेळा पुरस्काराची घोषणा केली नाही त्यामुळे या पुरस्काराची घोषणा त्वरित करावी व संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळाच्या विकासाला गती देण्यासाठी माझ्या कार्यकाळात शासनाने जो निधी मंजूर केला आहे या साठी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करून 14 जानेवारी रोजी होणाऱ्या जन्मोत्सवाचे निमंत्रण मतदार संघाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी सामाजिक न्याय मंत्री ना संजय शिरसाट यांची छत्रपती संभाजी नगर येथे भेट घेऊन निमंत्रण दिलं आहे. यावेळी शिवसेनेचे नेते सुदाम काकड,दीपक पवार आदी मंडळी उपस्थित होते
संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव लोकोत्सव व्हावा या बद्दल पुढाकार घेतल्या जात आहे मात्र प्रशासकीय उदासीनता आणि चोखामेळा यांच्याबद्दल नसलेली माहिती ही नागरिकांमधील उदासीनतेमुळे जन्मोत्सवाला विशाल असे स्वरूप आलेले दिसत नाही महाराष्ट्र ही संतांची भूमी असून याच भूमीत अनेक संत होऊन गेले आहे बाराव्या शतकात विठुरायाचे भक्त संत चोखामेळा यांचा जन्म 14 जानेवारी बाराशे 68 देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा राजा येथे झाला महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला थोर संताची चांगली शिकवण दिली त्या चोखामेळा यांचेही नाव आदराने घेतले जात त्यांचे जन्मस्थळ आजही उपेक्षित आहे या जन्मस्थळाचा विकास व्हावा याकरिता मागील काही वर्षापासून या विभागाचे तत्कालीन आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी प्रयत्न केले संत चोखामेळा यांच्या बद्दल ची माहिती सर्वांना व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करण्यासाठी माजी आ डॉ शशिकांत खेडेकर यांनी शर्तीचे प्रयत्न केले त्यानुसार दोन वर्षी संत चोखामेळा यांच्या नावानं राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा झाली आणि तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत पुरस्कार ची घोषणा केली पहिला पुरस्कार राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांना सन 2018 देऊन गौरविण्यात आले दुसरा पुरस्कार सप्तखंजेरीवादक तुषार सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला मात्र नंतर चोखामेळा यांच्या नावाने पुरस्कार हा अद्यापही दिला नाही त्यामुळे चोखा भक्तांमध्ये नाराजीचा सुरू उमटतं आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून या पुरस्काराची पुन्हा सुरुवात करावी अशी मागणी यावेळी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!