spot_img
spot_img

💥💥 BREAKING! बापरे! तो विकत होता कामोत्तेजक औषधी! – मेडिकल मधून विकल्या जात आहेत गर्भपात व नशेच्या गोळ्या! – अन्न औषध प्रशासनाने केला 24.33 लाखाचा औषध साठा जप्त!

लोणार (हॅलो बुलडाणा) मेडिकलला परवाना मिळाला म्हणजे कोणत्याही औषध-गोळ्या सर्रास विकाव्या,असा नियम नाही.परंतु लोणार येथील सुशील पूनमचंद दरोगा यांच्याकडून नमुना 16 पंचनाम्यातर्गत एकूण 24.33 लाखांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे.विशेष म्हणजे चंदन मेडिकल स्टोअर्स लोणार येथून एकूण 8225 रुपयांची vigorox 100 mg ही कामोत्तेजक औषधी जप्त करण्यात आली आहे.दरम्यान मेडिकल मधून गर्भपात करणाऱ्या व नशेच्या गोळ्या विकल्या जात असल्याचे शिक्कामोर्तब होत असून,अन्न औषध प्रशासनाने आज मोठी कारवाई केली.

सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन म.राज्य, बुलढाणा कार्यालयातील औषध निरीक्षक, गजानन प्रल्हाद घिरके यांना लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाली होती. त्या आधारे एम.व्ही. गोतमारे, औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन म.राज्य वाशिम यांच्या समवेत 19 डिसेंबर रोजी मौजे लोणार येथे चंदन मेडीकोजचे मागे रुम क्रमांक 1,बस स्टँड जवळ, लोणार येथे तपास चौकशी केली असता सदर जागेत विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आल्याने सुशिल पुनमचंद दरोगा हजर व्यक्ती यांच्याकडून
नमूना 16 व पंचनामा अंतर्गत एकूण 24.33 लक्ष रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सदर औषध नमूना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
तसेच चंदन मेडीकल स्टोअर्स, लोणार येथे तपासणीस्तव भेट दिली असता त्यांच्याकडे
कामोत्तेजक औषधी (Vigrox-100) आढळून आल्याने रुपये 8225 रुपयांचा साठा प्रतिबंधीत करण्यात आला आहे. झोपेच्या गोळया,गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व सर्व अॅलोपॅथीक औषधे मेडिकल धारकांनी कोणत्याही परीस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ग्राहकांना देवू नयेत,
तसेच प्रत्येक औषधाचे औषध विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उल्लघंन केल्याचे
आढळून आल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!