spot_img
spot_img

‘या’ भ्रष्टाचाऱ्यांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सडेतोड वृत्त छापलं आणि एका जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटदारावर थेट गुन्हा दाखल झाला.आता या कंत्राटदाराने एक युक्ती योजली असून,आरोग्य विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग, आणि महसूल विभाग तसेच जिल्हा परिषद यासह सहकार विभागातील भ्रष्टांनी एकत्र येऊन सदर पत्रकाराला कोणतत्याही गुन्ह्यात अडकवूच असा प्रण घेतल्याची माहिती आहे.पण घाबरणार ते पत्रकार कसले? याबाबतची तक्रार पोलीस महासंचालकांना देण्यात आली आहे.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो, लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी पत्रकारिताही तेवढीच प्रामाणिक,निर्भीड व सर्वात महत्वाचे म्हणजे नि:पक्षपाती असायला हवी,या दृष्टिकोनातून एका बड्या पत्रकाराने सर्वच विभागातील भ्रष्टाचार गेल्या काही दिवसात वृत्त प्रकाशित करून बाहेर काढले आहे. दरम्यान त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असून, आता या महाप्रतापींनी गुंडशाहीचा मार्ग अवलंबला आहे.सदर पत्रकार यांना सोशल माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या.खोट्या प्रकरणात अडकवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.पत्रकार तीस वर्षापासून निर्भीड व पारदर्शीपणे पत्रकारिता करीत असून आता त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे.विशेषता
आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग, आणि महसूल विभाग तसेच जिल्हा परिषद व सहकार विभागातील भ्रष्टाचारी एकत्रित आलेत. त्यांनी सत्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू केला असून, तशा हालचाली जाणवत असल्याने याप्रकरणी पोलीस महासंचालकांना तक्रार देण्यात आली आहे.जिल्हा पोलीस यंत्रणा सजग आहे त्यामुळे या भ्रष्टांचे मनसुबे उधळून लावू असे पोलीस यंत्रणेने आश्वासित केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!